
दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात आज रविवारी सायंकाळी तीव्र भूकंपाचे धक्के
देशाची राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात आज रविवारी (12 एप्रिल) सायंकाळी तीव्र भूकंपाचे धक्के बसले अचानक सुरु झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे दिल्लीतील लोक घाबरुन घराबाहेर पडले. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती. मात्र, भूकंपाने लोक आपला जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडले. गाजियाबादमध्ये देखील भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. याची तीव्रता 3.5 रिश्टर इतकी होती.
www.konkantoday.com