जिल्हा शासकीय रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या प्रकारातील दोषींवर कारवाईची मागणी-अॅड .पटवर्धन
रत्नागिरी जिल्हा रुग्णालय कोरोना रुग्णालय झाले आहे. ठराविक प्रवृत्तीचे लोक तेथे बेकायदा एकत्र येऊन जमाव करत आहेत.प्रसंगी हे बेशिस्त लोक आक्रमक होत असून हा विषय रत्नागिरीसाठी धोक्याचा आहे.१० तारीख रोजी रात्री रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना आक्रमक वृत्तीला सामोरे जावे लागले.अशा प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.या पत्रात म्हटले आहे की, ता. १० रोजी सायंकाळी तेथे रुग्णांव्यतिरिक्त अन्य नागरिक आले होते. कोणतेही सोशल डिस्टन्सिंग
न पाळता धार्मिक प्रार्थनाही केली गेली. काही रुग्ण जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन केले आहेत. प्रशासन काही नागरिकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यासाठी आणत आहेत. मात्र, संध्याकाळी रुग्णालयात रुग्णांव्यतिरिक्त अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपिस्थत होते. बेकायदा जमाव करून हे लोक एकत्र कसे काय येतात. त्यांना प्रतिबंध का होत नाही? रुग्णालयात सुरक्षा व्यवस्था नाही का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, जुजबी बोलून असे विषयांकडे दुर्लक्ष केले जाणार असेल तर हे धोकादायक आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांही या जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले. यामुळे त्यांना पूर्ण संरक्षण देण्याची व्यवस्था केली पाहिजे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यामुळे या गोष्टींकडे अतिशय गंभीर्याने पाहावे व कडक कारवाई त्वरीत करावी. रत्नागिरीकरांना वेठीस धरतात विशिष्ट मनोवृत्ती, जीवनपद्धती जोपासणाऱ्या नागरिकांकडून सतत कायद्याची चौकट मोडली जात आहे. कोरोनासंदर्भात दिलेले निर्देश,शिस्त यांची वारंवार आणि खुलेआम पायमल्ली होते आहे आणि यामुळे रत्नागिरीकरांना वेठीस धरतात, अशी स्थिती निर्माण झाल्याची खंत अॅड.
पटवर्धन यांनी पत्रात नमूद केली आहे.