लॉकडाउनच्या काळात विनाकारण बाहेर पडणार असाल तर जाताना गाडी घेऊन जाल आणि येताना चालत परत याल
रत्नागिरी जिल्ह्यात व शहरात पूर्णपणे लॉक डाउन जाहीर झालेले आहे तरी देखील दुचाकी व चार चाकी वाहने घेऊन अनेक नागरिक बाहेर पडत आहेत वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभुते व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरुवातीला वाहनांवर दंडही वसूल केला मध्यंतरी एका दिवसात दुचाकी घेऊन बाहेर पडल्याबद्दल नागरिकांनी सहा लाखांचा दंडही भरला तरीही वाहने रस्त्यावर येण्याच्या प्रमाणात फरक पडेना म्हणून पोलिसांनी हवा सोडण्याचा उपाय अंमलात आणला तर काहींचे वाहन परवाने काही काळा करता निलंबित केले तरी देखील रत्नागिरीकरांनी येरे माझ्या मागल्या सुरू ठेवले त्यामुळे वाहतूक पोलिसांनी गेल्या काही दिवसात दुचाकी व वाहने जप्त करण्यास सुरुवात केली अशा अनेक दुचाकी व फोरव्हिलर पोलिसांनी जप्त करून पोलीस मुख्यालय येथे ठेवल्या आहेत आता लॉक डाउनचा कालावधी संपल्यानंतर सोपस्कार करूनच वाहने वाहनधारकांच्या ताब्यात मिळणार आहेत आता लॉक डाउनचीमुदत तीस तारखेपर्यंत वाढविण्यात आली आहे त्यामुळे आपण दुचाकी किंवा चारचाकी वाहने घेऊन विनाकारण बाहेर पडण्याचा विचार करीत असाल तर जातेवेळी आपण जरूर वाहने घेऊन बाहेर पडाल मात्र येते वेळी वाहने जप्त झाल्याने चालतच घरी परतावे लागण्याची वेळ येऊ शकते
www.konkantoday.com