
पेटीएमला केवायसी सेवा अपडेट करण्याच्या बहाणाने महिलेची८७हजारांची ऑनलाइन फसवणूक
रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर भागात हॉटेल कार्निवल जवळ राहणाऱ्या मंजिरी घाेलकर या महिलेची अज्ञात इसमाने ऑनलाइनवरून ८७हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.यातील फिर्यादी घाेलकर यांच्या मोबाईल फोनवर अज्ञात इसमाने फोन करून तुमचे पेटीएमला केवायसी अपडेट नसल्याने अपडेट करण्यासाठी फिर्यादीला मेसेज केला व क्विक सस्पोर्ट अॅप ओपन करायला सांगितले त्यानंतर त्यावर आलेला आयडी नंबर विचारून फिर्यादी महिलेच्या सारस्वत बँक व बँक ऑफ इंडिया या दोनही खात्यातून ८७हजार रुपये काढून घेतले व फसवणूक केली याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com