
पंकजा मुंडे यांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन घेतलेल्या भूमिकेचं आमदार रोहित पवार यांचे कडुन स्वागत
भाजप नेत्या पंकजा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामाचं काल तोंडभरून कौतुक केलं. एवढी कठीण परिस्थिती मुख्यमंत्री व्यवस्थितपणे हाताळत आहेत, असं म्हणून एकप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या कामाचा दाखला त्यांनी दिला. पंकजा मुंडे यांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन घेतलेल्या भूमिकेचं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची स्वागत केलं आहे.
आता तुमचा चष्मा तुमच्या पक्षातील इतर नेत्यांनाही दिला तर चांगला कारभार चालत असताना करायची म्हणून ते टिका करणार नाहीत, असंही त्यांनी म्हटले आहे
www.konkantoday.com