
खेड येथील त्या कोरोना ग्रस्तांवर उपचार करणाऱ्या खाजगी डॉक्टरचा अहवाल निगेटिव्ह
अलसुरे गावातील कोरोना पॉझिटिव्ह होवून मरण पावलेल्या रुग्णाच्या नजिकच्या संपर्कातील २८जणांचे स्वॅब नमुने मिरज येथे पाठविण्यात आले होते. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.यामध्ये त्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टरचाही समावेश आहे मात्र या डॉक्टरवर कोरोना रुग्णांची माहिती लपवल्या बद्दल पोलिसांनी या आधीच गुन्हा दाखल केला आहे.जिल्हयात होम क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 1043 आहे. त्या सर्वांच्या हालचालींवर सर्व यंत्रणाचे लक्ष आहे.
www.konkantoday.com