आणखी एका होमक्वारटाईन व्यक्तीचा अन्य कारणामुळे मृत्यू
राजापूर तालुक्यातील मोसम येथील
होमक्वारटाईनकेलेल्या व्यक्तीचा अन्य कारणामुळे शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला
सदर व्यक्ती मोसम गावातील असून या व्यक्तीला मेंगलोर एक्स्प्रेसमधून आलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने होमक्वारटाईन करून ठेवण्यात आले होते सदर व्यक्तीला झाडावरून पडल्याने तसेच त्याची तब्बेत बिघडल्याने रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करणेत आले असल्याची माहिती मिळत आहे
मात्र उपचाराच्या दरम्याने त्यांचा तेथे मृत्यू झाला असे असले तरी दक्षता म्हणून त्यांचे अंत्यसंस्कार कोरोना बाधित मृत व्यक्ति प्रमाणे केले जाणार आहेत
www.konkantoday.com