सिंधुदुर्ग जिल्ह्यात 374 जण होमक्वारंटाइन,94 फिवर क्लिनीकही सुरू
सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षामध्ये 26 रुग्ण दाखल आहेत.आतापर्यंत 81 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले यापैकी 68 अहवाल प्राप्त झाले आहेत तर 13 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. जिल्ह्यात आता सध्या ऐकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 374 व्यक्तींना घरी व 68 व्यक्ती या संस्थात्मक अलगीकरणा आहेत.100 व्यक्तींचे 28 दिवसांचे अलगीकरण पूर्ण झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेमार्फत आज एकूण 1355 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य वर्धिनी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालय या सर्व संस्थांमध्ये एकूण 94 फिवर क्लिनीक सुरू करण्यात आली आहेत.
www.konkantoday.com