
विविध ५० भाषांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती प्रकाशित करण्यात येणार
निसर्गरम्य आणि मोहक समुद्र किनारा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटन विषयक महती देशात आणि परदेशात पोहोचविण्यासाठी विविध ५० भाषांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती प्रकाशित करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिकांनी एकत्र येत महासंघ स्थापन केला असून, या महासंघाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपूर्ण देशात आणि जगभरात मार्केटिंग करण्यासाठी जिल्ह्याची संपूर्ण माहिती असणारी अद्ययावत वेबसाईट भारतातील सर्व आणि जगभरातील इतर मिळून ५० भाषेमध्ये तयार केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली आहे
www.konkantoday.com