रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आलेल्या रुग्ण व नातेवाईकांनी घातला गोंधळ,आरोग्य कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचा आराेप
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांनी गुरुवारी रात्री गोंधळ घातला. कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट खोटे बनवले असल्याचा कांगावा करत सदर रुग्ण व नातेवाईकांनी गोंधळघातला व रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावरही धाऊन गेले व आरोग्य कर्मचाऱ्यांना धमकी दिल्याचेही रुग्णालयाच्या कर्मचाऱयांचे म्हणणे आहे. त्यानंतर नर्स, डॉक्टर आणि वॉर्डबॉय यांनी आक्रमक भूमिका घेत या साऱ्या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे धमकीचा सारा प्रकार जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कानावर घातल्यानंतर देखील त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी ऑनड्युटी असणारे कर्मचारी यांनी केला आहे.त्यामुळे आता रुग्णांकडून मिळणाऱ्या अशा वर्तणुकीमुळे कर्मचाऱयांमध्ये नाराजी व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
www.konkantoday.com