रत्नागिरीत आणखी एका महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझेटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.दोन दिवसांपूर्वी साखरतर येथील एका महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह ला होता त्या महिलेशी संबंधित तिचे नातेवाईक असलेल्या महिलेचा रिपोर्ट कोरोना पोझिटिव्ह आला आहे.या महिलेचे वय ४९ आहे.त्यामुळे आता रत्नागिरीत आतापर्यंत पाच पॉझेटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.यातील गुहागर शृंगारतळी येथील एक रुग्ण पूर्णपणे बरा झाला होता.
तर खेडमधील एका रुग्णांचा मृत्यू झाला होता.
www.konkantoday.com