मुंबईत झोपडपट्टी भागात लहान घरांमध्ये राहाणाऱ्या नागरिकांची राहण्याची व्यवस्था आता शाळांमध्ये
कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकार महत्त्वाचे पावलं उचलत आहेत. मुंबईत झोपडपट्टी भागात लहान घरांमध्ये राहाणाऱ्या नागरिकांची राहण्याची व्यवस्था आता शाळांमध्ये केली जाणार आहे. याशिवाय सार्वजनिक शौचालयं दर तासाला धुतली जाणार असून निर्जंतुकीकरण केलं जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
www.konkantoday.com