दापोलीकरांना दिलासा खेड मध्ये गेलेल्या नवरा बायकोचा कोरोना अहवाल निगेटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या खेड मधील त्या व्यक्तीला तो परदेशातून आल्यावर भेटण्यास गेलेल्या
दापोली शहरात राहणाऱ्या त्याच्या दोन नातेवाईकांना ८ एप्रिल रोजी रात्रीच खबरदारीचा उपाय म्हणून दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते व त्यांच्या स्वँबचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले होते.त्या नवरा बायकोचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
ते खेड मध्ये मृत्यू मुखी पडलेल्या व्यक्तीची नातेवाईक हाेते.
www.konkantoday.com