दहावीचा भूगोल पेपर न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात यावे –सुधीर मुनगंटीवार
लॉकडाउनमुळे इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा राहिलेला पेपर न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात यावे अशी मागणी भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकडे त्यांनी मागणी केली.
या प्रकरणी येत्या ४ दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासनही गायकवाड यांनी दिले आहे
www.konkantoday.com