साडेतीन वर्षांच्या सुज्ञा हिने अडीज वर्षांच्या मुलाला खड्ड्यात पडण्यापासून वाचविले
देवरुख येथील केशवसृष्टी येथील लिमये यांच्या घराजवळ खेळत असलेली देवरूख तहसीलदारांची साडेतीन वर्षांची मुलगी सुज्ञा हिने अडीच वर्षांचा छोटा मुलगा श्रीकर जोशी याला प्रसंगावधान राखून खड्ड्यात पडण्यापासून वाचविले हे दोघे खेळता करता घरामागील जागेत गेले घराच्या मागे तीन फुटाचा शोषखड्डा होता त्यावर सिमेंटचा पत्रा टाकलेला होता खेळत असताना ही छोटी मुले पत्र्यावर गेली आणि पत्रा फुटला काही कळायच्या आत श्रीकर हा खाली खड्ड्यात पडणार असतानाच चिमुकल्या सुज्ञा हिने त्याही परिस्थितीत मोठे प्रसंगावधान राखून श्रीकर यांचा हात धरून ठेवला आवाज झाला म्हणून श्रीकर ची आई घरामागे आली त्याने आरडा ओरड केल्यावर आजूबाजूचे धावत आले व त्यांनी दोघांना खड्ड्यांपासून लांब केले सुज्ञा हीने छोट्या वयातही दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल तिचे कौतुक करण्यात येत आहे संगमेश्वर तालुका प्रेस क्लब नेही तिचे घरी जाऊन कौतुक केले
www.konkankantoday.com