मुंबई-गोवा महामार्गावर स्कॉर्पिओने दुचाकीला उडविले, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावर देवधेनजिक अमेय धाब्याजवळ स्कॉर्पिओ चालकाने समोरून येणार्‍या दुचाकीला धडक दिल्याने त्यावरील दोघेजण गंभीर जखमी झाले होते. त्यातील एकाचा लांजा येथे उपचार चालू असताना मृत्यू झाला तर दुसर्‍या गंभीर जखमीला शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले आहे. स्कॉर्पिओचालक नवीनचंद्र पालव हे गोव्याहून मुंबईच्या दिशेने स्कॉर्पिओ घेवून जात असता देवधेनजिक समोरून येणार्‍या दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील गंभीर झालेल्यांना स्कॉर्पोओतील प्रवाशांनी इतरांच्या मदतीने लांजा येथे दाखल केले होते. परंतु तेथे उपचाराच्या दरम्याने एकाचा मृत्यू झाला. या दुचाकीस्वारांची ओळख अद्यापही पटली नव्हती

Related Articles

Back to top button