रुग्णास कोरोनाची लक्षणे व त्याचा परदेश प्रवासाचा इतिहास लपवल्या प्रकरणी डॉ.महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल
कळंबणी येथील उप जिल्हा रुग्णालयात काल एका रुग्णाचा मृत्यू झाला. 50 वर्षे वयाच्या या व्यक्तीने दुबईला प्रवास केल्याचा इतिहास आहे. त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते.क्वारंटाईन स्थितीत त्याला त्रास जाणवल्याने सदर रुग्ण खेड येथील डॉ. जावेद महाडिक यांच्या खाजगी रुग्णालयात 02 एप्रिल रोजी दाखल झाला होता. त्याला 6 एप्रिल रोजी कळंबणी येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे त्याचा मृत्यू झाला. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.सदर रुग्ण ज्या अलुसरे गावात राहत होता त्या गावात कोरोना विषाणू बाधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. त्याच्या संपर्कात असलेल्या सर्वांचे स्वॅब नमुने घेण्याची प्रक्रिया आरोग्य विभागामार्फत सुरु आहे.सदर रुग्णास कोरोनाची लक्षणे दिसत आहेत व त्याचा परदेश प्रवासाचा इतिहास आहे हे माहिती असताना डॉ. जावेद महाडिक याने शासकी यंत्रणेस न कळवता जिवीतास धोका असलेल्या रोगाचा संसर्ग होण्याचा संभव असणारी घातक कृती केली व याबाबत लागू आदेशांचा भंग केल्याने पोलीस ठाणे खेड येथे गु.र.न.81/220 आणि भादवि 269, 270,188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com