रत्नागिरीत २४ संस्थांची साखळी हेल्पिंग हॅण्ड्स
जनतेच्या मदतीला
करोना प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या संचारबंदीच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्यासाठी विविध सामाजिक संस्था काम करत आहेत. रत्नागिरीत अशा २४ संस्थांची साखळी हेल्पिंग हॅण्ड्स या नावाखाली संघटितपणे काम करत आहे. या साखळीमध्ये सुमारे १५० स्वयंसेवक काम करत आहेत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संस्था, स्वराज्य संस्था, रत्नदुर्ग माउंटेनीअर्स, शिरगाव हेल्पिंग हॅण्ड ग्रुप, अभाविप, अनुलोम संस्था, प्रयत्न प्रतिष्ठान, बजरंग दल, आरएसएस, संकल्प युनिक फाउंडेशन, कीर्तनसंध्या, घाणेकर आळी मित्र मंडळ, ब्रह्मरत्न, जनजागृती संघ, वैश्य युवा, रोटरी क्लब, ऑटोमोबाइल असोसिएशन, अनमोल फाउंडेशन, जिल्हा हज कमिटी, खैरे उम्मद फाउंडेशन, पावस्कर ब्रदर्स, जिद्दी माउंटेनीरिंग, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रोटरी क्लब मिडटाऊन, राजरत्न प्रतिष्ठान, भारतरत्न प्रतिष्ठान माउंटेनीअर्स असोसिएशन अशा चोवीस संस्था हे काम करत आहेत.प्रामुख्याने रत्नागिरी शहरातील गरजूंना औषधे आणि जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्याचे काम या संस्थेचे कार्यकर्ते करत आहेत.
www.konkantoday.com