
माला कोरोना रुग्ण वाढीचा ग्राफ खाली आणायचा आहे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पहिला रुग्ण आढळून काल चार आठवडे पूर्ण झाले.मला या वाढीचा ग्राफ खाली आणायचा आहे हे युद्ध आपण जिंकणार आहोतच,पण कोरोना नंतर आपल्याला अर्थव्यवस्थेशी युद्ध लढायचं आहे.तीन वेळच्या खाण्याची सोय सरकारने केली आहे.माणुसकीच्या नात्याने गरजूंना अन्नछत्राची व्यवस्था केली आहे.साडेपाच-सहा लाख लोकांना जेवण मिळतं .केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजनेत फक्त तांदूळ दिले जाताहेत, तेही फक्त लाभार्थ्यांसाठी,राज्य सरकार केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात धान्य देत आहे, घराबाहेर पडत असाल तर कायम मास्क वापरा, वापरलेला मास्क कुठेही फेकू नका . केशरी शिधापत्रिका धारकांना गहू आणि तांदूळ माफक किमतीमध्ये उपलब्ध करून देणारनिवृत्त सैनिक ज्यांना आरोग्य सेवेचा अनुभव आहे,निवृत्त सिस्टर किंवा वॉर्डबॉय किंवा भरतीची संधी न मिळालेल्या प्रशिक्षित व्यक्तींनी या युद्धात सामील व्हावे, Covidyoddha@gmail.com यावर नाव-नंबरने संपर्क साधा असे माझे आवाहन आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे .