
पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे स्वॅब घेतले, अहवालाची प्रतीक्षा
साखरतर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर कालच या गावाच्या 3 किलोमीटर परिघातील क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे स्वॅब नमुने घेऊन पुढे पाठविण्यात आले आहेत. अहवालाची प्रतीक्षा आहे.साखरतर गावात कडेकोट बंदोबस्त आहे. गावातील व्यक्तींचे आरोग्य यंत्रणेमार्फत सर्वेक्षण तसेच सर्व भागाचे निर्जंतुकीकरण आदि कामे सुरु आहेत. या भागातून बाहेर पडण्यास व इथे येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
प्रतिबंधित परिघापुढील 2 कि.मी. चा परिसर बफर झोन घोषित करण्यात आला असून येथेही याच प्रकारची उपाययोजना करण्यात येत आहे.
www.konkantoday.com