पूर्वीच्या बिलावर आधारित सरासरी बिल आकारण्याचा निर्णय हा चुकीचा

महावितरण कंपनीने लाँकडाऊन काळात रिडींग घेणे शक्य नसल्याने सरासरी शुल्क आकारण्याचा घेतलेला निर्णय सरासर चुकीचा आहे.​ ​यावर उपाय म्हणून त्यांनी वितरण कंपनीचा अँप डाऊनलोड करून आपलं रिडींग कळविण्याचा पर्याय दिलेला आहे.​ ​हा पर्याय किती टक्के लोकांना शक्य आहे.​ ​ग्रामीण भागात तर कनेक्टिव्हिटीची मोठी समस्या आहे.तिथ अँपच लोड होणार नाही. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे काही अत्यावश्यक सेवा सोडल्यास इतर अनेक आस्थापना,दुकाने,बेकरी,​ ​कोल्ड्रिंक्स हाऊस तसेच छोटे मोठे उद्योग, कारखाने पूर्णपणे बंद आहेत.​ ​त्यामुळे वीज वापरण्याचा प्रश्नच येत नाही. मग अशावेळी कोणतही रिडींग न घेता पूर्वीच्या बिलावर आधारित सरासरी बिल आकारण्याचा निर्णय हा चुकीचा आणि वीजग्राहकावर अन्याय करणारा आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button