
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याचा ठाण्यातील तरुणाचा आराेप
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनीआपल्याला घरातून उचलून नेऊन अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर तरुणाने केला आहे. फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने या तरुणाला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना घरात उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाडही त्याठिकाणी उपस्थित होते, असाही दावा त्या तरुणाने केला आहे. दरम्यान याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर विरोधी पक्षांनी सडकून टीका केली. यावर नुकतंच जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं.आपण त्याला ओळखतही नाही, अभियंत्याला अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप मंत्री जितेंद्र आव्हाडांनी फेटाळला आहे
www.konkantoday.com