लांजा देवधेत आजाराला कंटाळून ९० वर्षीय वृध्दाची आत्महत्या
आजाराला कंटाळून एका ९० वर्षीय वृध्दाने सार्वजनिक विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी लांजा देवधे दळवीवाडी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, देवधे दळवीवाडी येथील राजाराम तुकाराम दळवी ( वय- ९० ) यांना पोटदुखीच्या आजाराने त्रस्त होते. आजाराळा कंटाळून त्यांनी घराजवळ असलेल्या ६० फुट सार्वजनिक विहीरीत उडी मारून आत्महत्या केली.
www.konkantoday.com