
रत्नागिरीतील पावस जवळ सापडला मृतावस्थेत बिबट्या
रत्नागिरी पावस जवळील खांबड गावात आज सकाळी एक बिबट्या मृतावस्थेत आढळुन आला.सकाळी काही ग्रामस्थ या भागात आले असता त्यांना बिबट्या मृतावस्थेत दिसला.याबाबत वनविभागाला कळवल्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.गेल्या काही महिन्यात पावस परिसरातील गणेशगुळे परिसरात बिबट्याने ग्रामस्थांवर हल्ला करण्याचे प्रकार घडले होते.त्यानंतर वनखात्याने पिंजरे लावूनही बिबट्या पकडला गेला नव्हता.त्यामुळे या परिसरात बिबटय़ाचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते.आता मृतावस्थेत बिबट्या सापडल्याने ते सिद्ध झाले आहे.
www.konkantoday.com