सामाजिक कार्याचे भान ठेवून संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी यांनी केलेले कार्य कौतुकास्पद

कोरोना या महाभयंकर आजारामुळे सारं जग सुन्न झाले लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून संपूर्ण देशात लॉक डाउन करण्यात आले.यांचा परिणाम गोरगरीब जनतेवर आधिक प्रकर्षांने जाणवला साधा चहा सुध्दा मिळणे शक्य झाले नाही.संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी या एनजीओ च्या कार्यकर्त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय हे केंद्र बिंदू मानून तेथे रुग्णांची अहोरात्र सेवा करणा-या या संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी यांनी येथे येणा-या गरीब रुग्णांच्या नातेवाइकांना दररोज सकाळी चहा, दररोज दुपारी व रात्री जेवण देण्याचे ठरविले कोणत्याही प्रकारचा निधी जवळ नसताना स्वतःची पदरमोड करून उपाशी रहात असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना त्यांनी दिलासा दिला या उपक्रमाची चर्चा झाली आणि अनेक दानशूर या उपक्रमाला सहकार्य करू लागले केवळ काम करण्याची प्रबळ इच्छा घेवून त्या कामात आपला वेळ देत अगदी डेंजर झोन मध्ये जीवाची पर्वा न करता या कार्यकर्त्यांनी 24 एप्रिलपासून हे महत्त्वाचे कार्य हाती घेतले
दररोज सुमारे 150 रुग्णांच्या नातेवाइकांना चहा,व दोन वेळचे जेवण सुरू केले
या कामी संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी चे अध्यक्ष दिलावर कोंडकरी, उपाध्यक्ष शकील गवाणकर, जनसंपर्क प्रमुख नाझीम मजगावकर, खजिनदार सयीद मुल्ला, सचिव युसुफ शिरगावकर, जिल्हा संघटक जमीर खलफे, रुग्ण मदत केंद्र प्रमुख ईस्माइल नाकाडे, युवा अध्यक्ष हर्षल कुलकर्णी, रुग्णवाहिका प्रमुख आझीम फकीर यांनी हे शिवधनुष्य उचलले आणि त्यात ते यशस्वी झाले.कोकणनगर भागातून अनेकांनी रोज जेवण बनविण्यापासून,ते पॅकिंग करून ठेवणे पर्यंत काम दररोज स्वखुषीने केले,आझीम फकीर व त्यांचे कुटुंबीय यांनी हे जेवणाचे पॅकिंग दररोज दिवसातून दोन वेळा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्याचे कार्य केले
मिरकरवाडा येथील उद्योजक फैसल सरदार यांनी दररोज दुपारचे जेवण देण्याची जबाबदारी घेतली बघता बघता अनेकांनी या मोहिमेत सहभाग घेतला अशा प्रकारे संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे अनेकांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button