रत्नागिरीत आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी तात्पुरत्या स्वरूपात भरती
आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याबाबत राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी पुढाकार घेतला असून a (दि. ६ एप्रिल) इच्छुकांनी त्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात भरती करावी, असे निवेदन राजापूरचे आमदार श्री. साळवी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले होते. त्याच अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात भरतीप्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. या तात्पुरत्या पदांसाठी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी (दि. ६ एप्रिल) सायंकाळी ५ वाजेपर्यंत dpmratnagiri.2017@gmail.com या ईमेल आयडीवर विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. सोबत पदवी प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे स्कॅन करून पाठवून द्यावीत. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी भरती प्रक्रियेत भाग घेऊन देशावर आलेल्या करोनारूपी संकटाशी लढाई योगदान करावे, असे आवाहन श्री. साळवी यांनी केले आहे.
www.konkantoday
com