दारूसाठी काय पण!
राज्य उत्पादन शुल्क कार्यालय फोडून विदेशी दारूची चोरी
सध्याच्या परीस्थितीत दारूची दुकाने बंद असल्याने मद्य प्रेमी अस्वस्थ आहेत अशाच काही मद्य प्रेमीनी दारूसाठी चक्क राज्य उत्पादन शुल्क कार्यालय फोडले
वाई येथिल राज्य उत्पादन शुल्क कार्यालय फोडून टाळेबंद करून ठेवलेल्या एक लाख ४१ हजार रुपयांच्या देशी-विदेशी दारूची चोरी झाल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
पाचगणी व महाबळेश्वर परिसरात कारवाईत जप्त केलेल्या देशी-विदेशी दारूचा साठा या कार्यालयात ठेवण्यात आला होता. गुरुवारी मध्यरात्री चोरटय़ांनी कार्यालयाचा मुख्य दरवाजा तोडून कार्यालयात ठेवलेल्या देशी दारूच्या सुमारे ९०० भरलेल्या बाटल्या व ६७ हजार ४८० रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्या असा एक लाख ४१ हजार ४८० रुपयांचा मालाची चोरी झाली
www.konkantoday.com