
एका महाभागाने चक्क ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चं विक्रीला काढले
करोना व्हायरस या महामारीच्या लढ्यात मोदी यांनी जनतेला आर्थिक मदतीचं आवाहन केलं होते.त्याला प्रतिसाद देत गुजरातमधील एका महाभागाने चक्क ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चं विक्रीला काढले आहे. गुजरातमधील या बातमीमुळे लोकांचे डोळे मोठे झाले आहेत. सरदार वल्लभभाई पटेल, आयर्न मॅन ऑफ इंडिया यांचा जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी नावाने ओळखला जातो. २०१८ मध्ये हा पुतळा उभारण्यात आला यासाठी तब्बल २९८९ कोटींचा खर्च झाला होता. आता हीच संधी साधून एका व्यक्तीनं ओएलक्सवर स्टॅच्यू ऑफ युनिटी विक्रीसाठी काढला आहे सोशल मिडीयावर या गोष्टीची तुफान चर्चा चालू झाली .स्टॅच्यू ऑफ युनिटी’ विक्रीसाठी काढून मस्करी केल्याचं समजताच कंपनीनं ओएलएक्सवरून जाहीरात तात्काळ हटवली आहे. पोलिसांनी अज्ञांत व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे
www.konkantoday.com