इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश
गेल्या काही दिवसांत भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आता कोरोना भारतात प्रचंड थैमान तर घालणार नाही ना, अशी भीती भारतीयांना आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे चीननंतर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असूनही कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या ही इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. याचे श्रेय जागतिक आरोग्य संघटनेने भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना दिले आहे.
www.konkantoday.com