
आदेश डावलणाऱ्या राजीवडा येथील २०० जणांवर शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
राजीवडा येथे कोरोना रुग्ण असताना आणि जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी लागू केलेली असताना जिल्हाधिकारी यांचे आदेश डावलणाऱ्या राजीवडा येथील २०० जणांवर शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहेआरोपी यांनी राजीवडा येथे एक कोरोना संसर्ग बाधित रुग्ण असताना कोरोना विषाणुचे अनुषंगाने पसरण्याचा संभव आहे हे माहित असताना बेकायदेशीर जमाव केला. बेकायदेशीर जमाव जमवुन राजीवडा, खडपेवठार बाजुकडील सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीर जमाव जमवुन हयगईने बेकायदेशीर कृती केली. जिल्हाधिकारी यांचे जमाव बंदी आदेशाचे उल्लघंन केले तसेच फिर्यादी हे शासकिय कर्तव्य पार पाडीत असताना त्यांचे जवळील . मोबाईल व लाठी हिसकावण्याचा प्रयत्न करुन ने फिर्यादी यांचे डोक्यात मारून शासकीय अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com