महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी चुरशीने मतदान झाले. शुक्रवारी 31 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून सिंधुदुर्गनगरी येथे शिक्षक पतपेढी सभागृहात मतमोजणी सुरु झाली. यात महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. त्यांच्या विरोधात राणे गटातील विठ्ठल देसाई होते. दोघांनाही १७-१७ मते पडल्याने टाय झाले. पण चिठ्ठी काढून विठ्ठल देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या 19 जागांपैकी भाजपला ११ तर महाविकास आघाडीला ८ जागा मिळाल्या आहेत. जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत, विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजन तेली पराभूत झाले आहेत. काल झालेल्या मतदानावेळी जिल्ह्यातील एकूण 981 पैकी तब्बल 968 मतदारांनी म्हणजे 98.67 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 115 महिला व 853 पुरुषांचा समावेश होता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button