महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार होण्यासाठी हा पर्याय निवडणार?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार होण्यासाठी विधान परिषदेच्या पर्यायाची निवड केली आहे. विधानसभेच्या सदस्यांमधून परिषदेवर निवडून द्यावयाच्या गटातून ते आमदार होतील, अशी माहिती त्यांच्या निकटच्या एका मंत्र्याने दिली आहे. त्यामुळे येत्या २६ मे पर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमदार होतील.मुख्यमंत्र्यांसमोर तीन पर्याय आहेत. त्यातला पहिला अपवादात्मक परिस्थितीतला. त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा शपथ घ्यायची.दुसरा पर्याय विधान परिषदेवर राज्यपालनियुक्त सदस्य होण्याचा. आज अशी जागा रिक्त आहे. त्यावर ठाकरे यांची नेमणूक करण्याची शिफारस मंत्रिमंडळाला करता येईल. ती राज्यपालांवर बंधनकारक असेल. तिसरा पर्याय जास्त सुलभ असून तो परिषदेची निवडणूक लढविण्याचा आहे. शिवसेनेने यातला तिसरा पर्यायच स्वीकारला आहे.लॉकडाउन संपल्यावर लगेच ही प्रक्रिया सुरू होईल, अशी आशा शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केली.
www.konkantoday.com