
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला रत्नागिरीकरांचा मोठा प्रतिसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १३० कोटी जनतेला आज रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे लाइट बंद करून दरवाजात दिवा, टॉर्च, मेणबत्ती अथवा मोबाईलचा फ्लॅश लावून परिसर प्रकाशमय करा असे आवाहन केले होते.काेरोनामूळे सगळेकडे नैराश्याचा अंधार आहे.हा अंधार दूर करण्यासाठी आपण सर्व एकत्र लढा देत आहोत.ही एकीची भावना निर्माण होण्यासाठी मोदी यांनी आवाहन केले होते त्याला जिल्ह्यासह रत्नागिरीत मोठा प्रतिसाद मिळाला. रत्नागिरीकरांनी आपल्या घरातील लाईट बंद करून पणत्या व दिवे, फ्लॅश मेणबत्त्या लावून परिसर प्रकाशमान केला.यामध्ये मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वजण मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. रत्नागिरीकरांनी याआधी नरेंद्र मोदी यांच्या थाळी नादाच्या आवाहनाला ही मोठा प्रतिसाद दिला होेता.
www.konkantoday.com
