जमावबंदीचे उलंघन केल्या प्रकरणी नवा फणसोप येथे बारा जणांवर गुन्हा दाखल
जमावबंदी आदेश असताना आदेशाचे उलंघन करून रस्त्यावर एकत्र येऊन बेकायदेशीर जमाव केला व त्याला विराेध करणार्या फणसोपचे पोलीस पाटील यांना ढकलाबुकल केली व त्याना गाडीजवळ ढकलून दिले व सरकारी कामात अडथळा आणला म्हणुन नवा फणसोप येथील जमाव केलेल्या महिला व पुरुष अशा बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन एप्रिल रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास जमावबंदी आदेश असताना सदर आदेशाचे उलंघन करून नवा फणसोप येथील उर्दू शाळेच्या समोर रस्त्यावर एकत्र येऊन त्यानी बेकायादेशीर जमाव केला हाेता.
www.konkantoday.com