
आता ८ जुलै पासून महाराष्ट्रातील हॉटेल्स आणि रेस्तराँट सुरु होणार
महाराष्ट्रातली हॉटेल्स सुरु होण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेच होते.आता ८ जुलैपासून महाराष्ट्रातली हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू होणार आहेत.हॉटेल आणि रेस्टॉरंट्स यांना क्षमतेच्या ३३ टक्के सेवा देण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे.८ जुलैपासून रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स सुरु होणार असली तरी त्यांना नियमांचं पालन मात्र करावंच लागणार आहे. महाराष्ट्रात १ लाख ५० हजारांच्या घरात हॉटेल्स आहेत तर ६५ हजार रेस्टॉरंट्स आहेत.
www.konkantoday.com