आरोग्य कर्मचाऱ्यांना विरोध करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची कडक कारवाई ,माजी लोकप्रतिनिधीला घेतले पोलिसांनी ताब्यात
राजिवडा परिसरात कोरोना बाधित रुग्णां सापडल्यानंतर खबरदारी म्हणून या परिसरातील नागरिकांची तपासणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता त्याप्रमाणे आज आरोग्य कर्मचारी तपासणीसाठी गेले असता त्यांना एका स्थानिक लोकप्रतिनिधीने तपासणी करू नका असे सांगून तपासणीला विरोध केला होता त्यानंतरही पथके परत आल्यानंतर यांची गंभीर दखल प्रशासनाने घेतली जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी सूचना केल्यानंतर घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड ,उपविभागीय पोलीस अधीक्षक गणेश इंगळे ,शहर पोलीस स्थानकाचे निरीक्षक अनिल लाड व मोठ्या प्रमाणावर पोलिस ताफा घटनास्थळी आरोग्य पथकासह गेले त्यानंतर विरोध करणाऱ्यांची पोलिसांनी चांगलीच हजेरी घेतली व त्यांना ताब्यात घेतले सर्वांच्या दृष्टीने तपासणी महत्त्वाची असल्याने जनतेने आरोग्य कर्मचाऱयांच्या पथकांना सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले दरम्यान नामदार उदय सामंत यांनी आपला चिपळूणचा दौरा रद्द केला आहे असून ते या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देत आहेत.
www.konkantoday.com