रत्नागिरी शहरातील राजिवडा परिसरात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने खळबळ
रत्नागिरी शहरातील राजिवडा परिसरातील संशयित रुग्णाला १एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव आल्याने रत्नागिरी जिल्ह्यात आता अजुन एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे.आता सुरक्षितेच्या दृष्टीने या भागातील तीन किलोमीटर परिसर सील करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.संबंधित रुग्णाने मुंबईत रत्नागिरी असा रेल्वे प्रवास केला होता.त्यामुळे त्यांच्या सहवासात आलेल्या सर्व प्रवाशांचा आता शोध घेण्यात येत आहे.यातील काही प्रवासी चिपळूण,रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे उतरले होते.तसेच ते आणि कुणाच्या संपर्कात आले होते का? याचीही चौकशी करण्यात येणार असून या सर्वांची तपासणी होणार आहे.दरम्याने असे बाहेरून आलेल्या लोकांनी स्वतःहून माहिती द्यावी असे आव्हान वारंवार प्रशासनाकडून व पोलिसांकडून करण्यात आले होते तरी देखील जे नागरिक माहिती देण्याचे टाळत आहेत त्यांच्यावर व त्यांना मदत करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.दरम्याने नामदार उदय सामंत यांनी देखील जिल्हा पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच सध्याचा रुग्ण शोधण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जागृतता दाखवल्याबद्दल ही त्यांनी त्यांचे कौतुक केले.
www.konkantoday.com