देशाची १३० कोटी जनता एकत्र येऊन नैराश्याच्या अंधाराला छेद देऊया- प्रंतप्रधान नरेंद्रजी मोदी
देशातील जनतेने गेले ९ दिवस संचार बंदी पाळून खूप मोठे योगदान देशवासियांनी दिले आहे
तुम्ही घरात आहात पण स्वतःला एकटे समजू नका १३० कोटी लोक या कोरोनाशी एकत्र लढत आहेत कोरोनामुळे सगळीकडे नैराश्याच्या अंधार आहे पण या अंधाराला छेद द्यायचा आहे
यासाठीच रविवारी ५ एप्रिल ला रात्री ९ वाजता ९ मिनिटे आपल्या घरातल्या सगळ्या लाइट्स बंद करा आणि दरवाजात येऊन दिवा, टॉर्च, मेणबत्ती, मोबाइल फ्लॅश लाईट लावून परिसर प्रकाशमान करा मात्र हे सगळं घरात राहूनच करा
देशाची १३० कोटी जनता एकत्र येऊन नैराश्याच्या अंधाराला छेद देऊ या असे आवाहन प्रंतप्रधान नरेंद्रजी मोदी यानी जनतेला केले आहे
www.konkantoday.com
_