
गीतगायन स्पर्धेवर कलाशाखेची मोहोर,गीतगायन स्पर्धा विजेती – ईशानी पाटणकर
झेप २०१९ युवा महोत्सवात गीतगायन स्पर्धेत यावर्षी कलाशाखेच्या विद्यार्थ्यांनी मोहोर उमटवली. या स्पर्धेचे सर्व विजेते हे कलाशाखेचे विद्यार्थी ठरले. झेपच्या इतिहासात गीतगायनात कला शाखेने सर्व बक्षीसे पटकावण्याची ही पहिलीच घटना आहे. या स्पर्धेची प्रथम क्रमांकाची विजेती मानकरी एस.वाय.बी.ए.ची ईशानी पाटणकर ठरली. या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले टी.वाय.बी.ए चा चिन्मय जोशी व एस.वाय.बी.ए.ची अनुष्का देवरुखकर, तृतीय क्रमांक एफ.वाय.बी.ए च्या आसावरी निगुडकर हिने पटकावला.गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या झेप या युवा महोत्सवातील तिसऱ्या दिवशी गीत गायन स्पर्धेने रंगत आणली. ‘मै हु ही नही इस दुनिया की’, ‘कमली कमली’, ‘जब तक जहा में तेरा नाम है’, ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’ या गीतांनी बहार उडवून दिली. सहभागी स्पर्धकांनी उपस्थिताना गाण्याच्या तालावर थिरकायला लावले. सर्व विद्याशाखांतील एकूण १५ स्पर्धक सहभागी झाले होते. एस.वाय.बी.एससीच्या विद्यार्थ्यांनी या गीतगायन स्पर्धेचे आयोजन केले होते.
गीतगायन स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध गायक व माजी विद्यार्थी अभिजीत भट व ओंकार बंडबे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी परीक्षकांनी गीते सादर करून गीतगायन स्पर्धा अधिक रंगतदार केली परीक्षकांनी ‘तेरी दिवानी’ ‘झिंगाट’ गाण्यावर तरुणाईला नाचायला भाग पाडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा आचार्य हिने केले. पारितोषिक वितरणप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ.किशोर सुखटणकर, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ.यास्मिन आवटे, सांस्कृतिक समन्वयक प्रा.आनंद आंबेकर, डॉ. सीमा कदम, वाणिज्य विभागप्रमुख प्रा.भिंगारदिवे उपस्थित होते.
www.konkantoday.com