अब्रुनुकसानीचा दाव्याप्रकरणी नितेश राणे यांना कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावले

भारतीय जनता पक्षाचे नेते, आमदार नितेश राणे यांना माझगाव कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीचा दाव्याप्रकरणी नितेश राणे यांना कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे.अटक टाळण्यासाठी नितेश राणेंना १७ ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहावेच लागणार आहे.खासदार संजय राऊत यांनी ऍड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणात आता आमदार राणे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. याप्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीला नितेश राणे यांनी दांडी मारली, त्यांच्या वकिलांनी हजेरीपासून सूट देण्याची विनंती केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button