कोरोना विरुद्ध लढण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीजची जिल्हाधिकाऱयांना तीस लाखांची मदत
रत्नागिरी येथील फिनोलेक्स इंडस्ट्रीज कंपनीने त्यांच्या सीएसआर पार्टनर मुकुल माधव फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना तीस लाख रुपये कोरोनावरती उपाययोजना करण्याकरिता वैद्यकीय सहाय्यापोटी दिले.अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये लॉकडाउनचे नियम पाळण्याबरोबरच कोरोना विरुद्ध लढण्यासाठी जिल्हा प्रशासनांना मदत करणे ही देखील आपली सामाजिक जबाबदारी आहे असे फिनोलेक्स इंडस्ट्रीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी मिश्रा यांनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज तसेच मुकुल माधव फाउंडेशन चे आभार मानले.
www.konkantoday.com