
रत्नागिरीतील मांसाहारी खवय्यांनो तुम्ही श्रावण सोडण्याच्या तयारीत असाल तर त्याआधी हा आदेश बघा!
अधिक महिना आणि श्रावण यामुळे श्रावण सोडण्यासाठी अधिर असलेल्या रत्नागिरीतील मांसाहारी खवय्यांना रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रशासनाने थोडा धक्का दिला आहे जैन पर्युषण काळात शहरातील मटण आणि चिकन सेंटर बंद ठेवण्याचे आदेश रनप प्रशासनाने मटन व चिकन सेंटर दुकान चालकांना दिले आहेत. १२ सप्टेंबर व १९ सप्टेंबरला मटण आणि चिकन सेंटर्स बंद ठेवा असे लेखी आदेश रनप प्रशासनाने काढले आहेत.
या आदेशामुळे श्रावण सोडणाऱ्या मांसाहारी खवय्यांना थोडा धक्का बसला आहे गेले दोन महिने मंदीत असलेल्या मटण आणि चिकन विक्रेत्यांमध्ये नगरपरिषदेच्या या निर्णयामुळे प्रचंड नाराजी पसरली आहे. रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाने हा चेंडू शासनाच्या कोर्टात टाकला आहे रनप प्रशासनाने याबाबत राज्य शासनाकडून आदेश आल्याने आपण कार्यवाही केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे याबाबत स्थानिक प्रशासन काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे
www.konkantoday.com