कोकणात येण्यासाठी त्यांनी चक्क कोकण रेल्वेच्या रूळाचा पर्याय निवडला
राज्यात संचारबंदी केल्यानंतर मुंबईतील अनेक चाकरमान्यांचा मुंबईत राहण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. रेल्वे ,बस व अन्य प्रवासी वाहतूक बंद झाल्यामुळे जायचे कसे हा प्रश्न त्यांच्यापुढे होता. यावर त्यांनी पायी चालत जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. जिल्हा बंदी असल्याने ठिकठिकाणी पोलिसांनी रस्ते अडवले होते.मग कोकणात जायचे कसे? यावर त्यांनी चक्क कोकण रेल्वेच्या रूळावरून जाण्याचा पर्याय निवडला. दिवा ते खेड असा त्यांनी पायी प्रवास केला. वाटेत ठिकठिकाणी मुक्कामही केला. रेल्वे रूळावरून जाताना त्यांना कोणीही अडवले नाही. पण आज खेड जवळील खवटी रेल्वे स्टेशन जवळ हे चाकरमानी जेवण बनवत असता पोलिसांनी त्यांना हटकले असता सर्व प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे या लोकांकडे जेवण तयार करण्याचे सर्व साहित्य सोबत होते. गेले पाच दिवस मजल-दरमजल करत ते खेडमध्ये पोहोचले. रत्नागिरी जिल्ह्यात आल्यानंतर मात्र त्यांना पुढे जाण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी केली. यात अनेक तरूण कांही महिलांचा असा पंचवीस जणाचा समावेश आहे. सध्या त्याना तेथेच थांबविण्यात आले आहे.त्यांची राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था खेड नगपालिकेतर्फे तसेच तहसिल कार्यालयामार्फत करण्यात आली आहे.
www.konkantoday.com