
कुरतडे गावातील पालवकरवाडीमध्ये आणखी एक कातळशिल्प सापडले
रत्नागिरी तालुक्यातील कुरतडे येथे आणखी एक कातळशिल्प सापडले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी दहा हजार वर्षांपूर्वीच्या कातळशिल्पांचा शोध गेल्या सहा-सात वर्षांमध्ये लागला आहे. कुरतडे गावातील पालवकरवाडीमध्ये ‘आवळीचा भाटला’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या रानात पायवाटेजवळ हे कातळशिल्प दिसले. स्थानिक रहिवासी रघुनाथ नारायण पालवकर आणि विकास विलास पालवकर यांना ते दोघे त्यांच्या काजूच्या बागेत गेले असता हे कातळशिल्प आढळले. त्यांनी तेथील साफसफाई केली, तेव्हा मान नसलेली एक मानवी शरीराची रचना तेथे कोरण्यात आल्याचे स्पष्ट झाले. गावातील वयस्क मंडळींच्या माहिती नुसार या भागात खूप अशी कातळशिल्पे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या भागात शोध घेतला, तरी आणखी कितीतरी शिल्पे सापडण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com