हम ग्रुप कडून रत्नागिरी व देवरुखमध्ये धान्य वाटपाचा उपक्रम सुरू
लाॅकडाऊनच्या पार्श्वभुमीवर ‘ *हम ग्रुप’* कडून २५ मार्च पासून धान्यवाटपाचा उपक्रम रत्नागिरी व देवरुख मध्ये चालू आहे. रत्नागिरी मध्ये अॅड.सरताज कापडी , कु.कश्ती शेख , गौरव गांधी , असिफ मुजावर , श्रद्धा शेट्ये , आयेशा आघाडी , सविता चव्हाण तसेच देवरुख मध्ये धनश्री ठिक, शावाना वारोसे हे काम करत आहेत.हम ग्रुप कडून आतापर्यंत रत्नागिरी व देवरुख मध्ये जवळपास दोनशे कुटूंब म्हणजेच ८००-१००० लोकांना मदत करण्यात आली. मदतीचे स्वरुप डाळ ,तांदूळ, तेल , कांदे बटाटे असे आहे.या उपक्रमासाठी अनेक दानशूर व्यक्तिंनी मदत केली ; त्यामध्ये रत्नागिरी मध्ये गौरव शेट्ये , साहील मांजरेकर व युनिटी ग्रुप चे चारुहास पाध्ये , देवेन वळामे, चैतन्य पाटील, संयुक्ता रेडीज , यांकीत बोधे, निशांत जोशी , लौकीक पाटील , जुई आठल्ये , अक्षय आठल्ये, योगीनी आठल्ये , कश्ती शेख तसेच देवरुख येथे स्वाती ढोले, स्मिता भुवड , अक्षय लिमये, रावसाहेब चौगुले, डाॅ. पोले व परदेशातून मयुरेश पाटोळे आणि रिजवान खतीब ह्यांनी सामाजिक बांधिलकी जपत हम ग्रुप च्या ह्या उपक्रमास मदत केली.
www.konkantoday.com