निजामुद्दीन येथे झालेल्या मेळाव्यात कोकण विभागातील 200 जण आढळून आले
निजामुद्दीन येथे झालेल्या तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात सामाविष्ठ झालेल्या कोकण विभागातील 200 जण आढळून आले आहेत. त्यांचा शोध झाला असून उर्वरित लोकांची माहिती घेण्यात येत आहे. असे कोकण विभागीय महसूल आयुक्त श्री.शिवाजी दौंड यांनी सांगितले.श्री.शिवाजी दौंड म्हणाले की, निजामुद्दीन येथे तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात कोकण विभागातील 200 जणांची यादी प्रशासनास प्राप्त झाली असून त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील 139, रायगड जिल्ह्यातील 42, रत्नागिरी जिल्ह्यातील 3,पालघर जिल्ह्यातील 16 यांचा समावेश आहे.प्रशासनास प्राप्त झालेल्या यादीतील काही लोक बाहेरच्या राज्यात असण्याची प्राथमिक शक्यता आहे, तर उर्वरित तपास गतीने सुरु आहे.
www.konkantoday.com