रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना संबंधीत अपडेट्स
दिनांक :- 31 मार्च 2020
१) जिल्हयाभरात 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. या काळात सुरुवातीपासून जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब हे जिल्हाधिकारी तसेच कोरोना टास्क फोर्स आदिंच्या सतत संपर्कात असून ते वेळोवेळी जिल्हयातील घडामोडींचा आढावा घेत आहेत आणि वेगवेगळया सूचना देखील त्यांनी या काळात केल्या आहेत. मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत ते सातत्याने आहेत.
२) जिल्हयात दुचाकी वाहतुकीला पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून याचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत आज दिवसभरात ६८ वाहने जप्त करण्यात आली.
३) होम क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ८९४ इतकी आहे. हे लोक बाहेर इतरांमध्ये मिसळणार नाहीत तसेच इतर कुणी त्यांची भेट घेणार नाही यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.
४)जिल्हा सामान्य रुग्णालयात निगेटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तींना सोडण्यात आले असून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. आज अखेर रुग्णालय संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची एकूण संख्या ७ आहे.
५) जिल्हयाच्या सर्व सिमा बंद करण्यात आल्या आहेत अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कुणासही जिल्हयात अथवा जिल्हयाबाहेर जाऊ दिले जात नाही.
६) लॉकडाऊन मुळे जिल्हयात अडकलेल्या इतर जिल्हयातील व राज्यातील नागरिकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. जिल्हयात 02 शिबीरात 64 जणांची सोय करण्यात आली आहे. तसेच ज्यांना निवासाची सोय उपलब्ध आहे परंतु भोजनाची व्यवस्था नाही अशा एकूण 680 लोकांची भोजनाची सोय प्रशासानाच्या माध्यमातून समाजसेवी संस्था/व्यक्तींच्या मदतीने करण्यात आली आहे.
७) अत्यावश्यक सेवेसाठी वापरण्यात येणारे शासकीय किंवा खाजगी वाहने नादुरुस्त झाल्यास ती दुरुस्त करण्याच्या दृष्टिने गॅरेजची सुविधा पुरविण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीचा 01 वाहन अत्यवश्यक व आरोग्य सेवा यासाठी व प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 01 छोटे मालवाहतूक वाहन अधिग्रहीत करुन त्यास पोलीसांमार्फत परवाना देण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे.
७) होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
www.konkantoday.com