
महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र सरकारच्या हिंदीला तिसरी भाषा म्हणून मराठी जनतेवर लादण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना कडाडून विरोध करणार आहे
.**मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी आणि अस्मितेच्या रक्षणासाठी हा लदा निर्णायक असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. मराठी भाषेचे प्रेम आणि अभिमान वार्य जपण्यासाठी खेड मधील शाळांना पत्र वितरणाची मोहीम मनसेने सुरु केली आहे. मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा मा.नगराध्यक्ष अँड वैभवजी खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली नुकताच झालान सदर वेळी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, खेड तालुकाध्यक्ष निलेश जी बामणे,शहर उपाध्यक्ष मंगेश चव्हाण,अँड मिलींद उर्फ दादु नांदगांवकर,मनविसे खेड तालुका सचिव स्वरुप माजलेकर, अभिजीत कदम,उदय उर्फ पप्पु गुहागरकर, प्रदिप भोसले, पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते .**मनसे अध्यक्ष हिंदुजननायक सन्मा.रा
जसाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मितेच्या संवर्धनासाठी व्यक्त केलेल्या विचारांचा गील प्रसार करण्यासाठी आणि शाळांमध्ये मराठी भाषेला प्राधान्य मिळावे यासाठी ही पत्रे विपरीत केली आहेत.
.*पत्र वितरणाबरोबच शाळामध्ये मराठी भाषेच्या संवर्धनाबाबत चर्चा घडवून आणण्याचेही या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. मनसेने यापूर्वीही मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी विविध आंदोलने केली असून, या मोहिमेद्वारे मराठी अस्मितेचा आवाज आणखी बुलंद करण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे. ही मोहीम राज्यभरातील विविध तालुक्यामध्ये पुढे राबवली जाणार असून, मराठी जनतेला एकजुटीने या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन मनसेने केले आहे.*