
रत्नागिरी जिल्हा रुग्णालय फक्त कोरोना उपचार रुग्णालय होणार,इतर विभाग शिर्के हायस्कूल येथे हलवण्याच्या हालचाली सुरू
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या एकमेव असलेल्या कोरोना रुग्णांची टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी सध्या प्रशासन करून सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात आहे.जिल्ह्यात विदेशातून व अन्य भागातून आलेल्या ८५८ जणांना घरीच विलगीकरणासाठी ठेवले आहे.मात्र गरज पडल्यास रत्नागिरी शासकीय रुग्णालय ४०० खाटांचे कोरोना उपचार रुग्णालय म्हणून तयार करण्यात येणार असल्याची माहिती काल नामदार उदय सामंत यांनी दिली होती.आता या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून रत्नागिरी शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग व अपघात विभाग हे माळनाका येथील शिर्के हायस्कूल येथे स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने खात्याने पावले उचलली असून येत्या एक दोन दिवसात त्या ठिकाणी हे विभाग हलवण्यात येणार आहेत अशी माहिती मिळत आहे.
www.konkantoday.com