
रत्नागिरी एमआयडीसीत अडकलेल्या तामिळनाडूच्या तरुणांना रत्नागिरी पोलिसांच्या तात्काळ मदतीबद्दल तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकडून आभार
रत्नागिरी एमआयडीसीत तामिळनाडूमधील २०० तरुणांना ४ दिवसांपासून अन्न मिळाले नसल्याची माहिती त्या तरुणांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून कळवली होती.त्यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या बाबत कळवले होते.हे तरुण रत्नागिरीत असल्याचे लोकेशन गुगल मॅपद्वारे त्यांनी दिले होते.याबाबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी प्रशासनाला याबाबत माहिती दिली.रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी याची तात्काळ दखल घेऊन या तरुणांची तात्काळ जेवणाची व्यवस्था केली व अत्यावश्यक असणारे धान्य व अन्य गोष्टींचा पुरेसा पुरवठा उपलब्ध करून दिला व तशी माहिती तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना ट्विटरद्वारे कळवली.त्यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत तात्काळ दखल घेतल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व रत्नागिरी पोलिसांचे ट्विटरद्वारे आभार मानले.हे तरुण गेले काही महिने रत्नागिरी एमआयडीसीमध्ये प्रशिक्षणासाठी आल्याचे कळते.
www.konkantoday.com
